Comments system

About Sutrakar

सुत्रकार (ता. तलासरी) देशातील पश्चिम भागातील महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागात येणार्‍या पालघर जिल्ह्यातील एकुण आठ तालुक्यांमधील तलासरी तालुक्यातील एक सर्वा मोठे आणि 100 टक्के आदिवासी जनतेचे गाव आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यावसाय शेती, शेतमजुरी आणि पशुपालन आहेशेतीमध्ये भात, ज्वारी, तुर, उडीद, चवळी आणि खुरसाना तसेच भाजीपाल्याची शेती केला जातो. गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत आहे. सुत्रकार हे एक सुशिक्षीत आणि समजदार लोकांचे गाव म्हणुन ओळखले जाते. प्रत्येकासी प्रेमाने आणि एकमेकांना मदत करुन एक्कीने राहने हा विशेष गुण येथील लोकांमध्ये आहे.
सुत्रकार खरोखरच एक उत्तम गाव आहे जेथे प्रत्येक कोपऱ्यात आणि कोपर्‍यात नैसर्गिक वैभव आहे. हे गाव चारही बाजुंनी पसरलेल्या आश्चर्यकारक पर्वतांमध्ये वसलेले आहे आणि येथील काळुही आकर्षक नदी गावात निर्दोष वातावरण बनवते आणि लोकांना त्रुप्त करते.  हे एक शांततेने भरलेले गाव आहे.
 हे विलक्षण गाव अतिशय सुंदर असलेल्या तलाव, ओढे-नद्या, बंधारे आणि वाघया यांनी भरलेला आहे. पावसाळयात दुरवर पसरलेल्या हिरव्या रंगाची भाताची शेती आकर्षीत करत असते आणि लोकांमध्ये सद्भावनेची भावना निर्माण करते. येथील संस्कृती आणि वारसा तसेच कला, चित्रकला आणि क्रीडा यासाठी प्रसिद्ध गाव आहे.

गावात एकुण बारा पाडे आहेत
1.   बेंडगपाडा
2.   डोगरपाडा
3.   डोंगरीपाडा
4.   गोवरशेतपाडा
5.   काकडपाडा
6.   कोकाटपाडा
7.   काटेलपाडा
8.   पाटीलपाडा
9.   लाखनपाडा
10. सुरतीपाडा
11. शनवारपाडा
12. वेडगपाडा

शेजारील गावेः तलासरी, कुरझे, वेलुगाव, अनविर, कोचाई, आमगाव, वरव्हाडा.
शेजारील राज्यः गुजरात आणि दादरा व नगर हवेली
शाळाः
1.   शासकिय आश्रम शाळा सुत्रकार कोकाटपाडा
2.   जिल्हा परीषद शाळा सुत्रकार कोकाटपाडा
3.   जिल्हा परीषद शाळा सुत्रकार शनवारपाडा
4.   जिल्हा परीषद शाळा सुत्रकार काटेलपाडा
5.   जिल्हा परीषद शाळा सुत्रकार लाखनपाडा
6.   जिल्हा परीषद शाळा सुत्रकार गोवरशेतपाडा
7.   म सा अंधेर माध्यमिक शाळा सुत्रकार वेडगपाडा
8.   श्री सद् गुरु दादा (भागवत) विद्यानिकेतन सुत्रकार सुरतीपाडा

राशन दुकानः पाटीलपाडा आणि कोकाटपाडा
पशुपालन केंद्रः 1. महाराष्ट्र गोपालन समिती सुत्रकार शनवारपाडा
             2. नवजिवन पोल्ट्री फाम सुत्रकार शनवारपाडा

मैदानः क्रांतीदुत बिरसा मुंडा मैदान सुत्रकार शनवारपाडा

बस स्थानकः सुत्रकार कोकाटपाडा
सुत्रकार ते तलासरी (सकाळी 6.10)
तलासरी ते सुत्रकार (संध्या 6.00­)

सुत्रकार ला पोचण्यासाठी साधनेः  स्थानिक रीक्षा
शेतीची अवजारेः नांगर, बैलगाडी, पावरटीलर
पाण्याचा स्त्रोतः नदी, हातपंप, विहीर, तलाव
बोलीभाषाः वारली, डावर, मराठी
पाळीव प्राणीः बैल, गाय, शेळी, कोंबड्या
राजकीय पार्टीः CPM, BJP, NCP, BVA आणि मनसे


About Sutrakar About Sutrakar Reviewed by SutrakarBlog on January 02, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.