वारली चित्रकला हा भारतीय लोक कलांमधील सर्वात जुना प्रकार आहे आणि या कलेचे मूळ महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील आदिवासी वारली समाजात झाला आहे. कलेचे हे स्वरूप प्रामुख्याने भौमितीय आकार जसे गोल, त्रिकोण आणि चौकोनांचा वापर करुन वारली जमातीची जीवन शैली आणि त्यांचा विश्वास दर्शविणारे असंख्य चित्र तयार केले
जातात. वारली चित्रकला विशेष प्रसंगी जसे दिवाळीच्या आणि लग्नाच्याप्रसंगी ‘चवक’ म्हणुन भिंतींवर काढले जाते. हे चित्र तपकिरी पार्श्वभूमीवर पांढर्या रंगाने काढले जाते. लाल मातीने सारवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पीठाच्या
साहाय्याने हे चित्र काढले जाते. वारली चित्रकलेमधील सर्वात लोकप्रिय थींमपैकी एक म्हणजे तारपानृत्य यामधील विशिष्ट स्वरूपातील मानवांची
सर्पिली श्रृंखला. त्यांच्या
विश्वासानुसार हे जीवन एक निरंतर प्रवास आहे आणि त्याचा प्रारंभ आणि शेवट
नाही.
हि सर्व चित्रे श्रीमती.सुलक्षणा इभाड, सुत्रकार (शनवारपाडा) यांनी काढलीत.
 |
PIC-6: -21.0"X13.5"
|
No comments: