१५नोव्हें.क्रातीसूर्य भगवान बिरसा मूंडा १४८वी जयंती निमित्त तलासरी येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील समर्पित क्रांतिकारक, भारतीय स्वातंत्र्याच्या क्षितीजावर उगवलेला शौर्यतारा,पारतंत्र हे एक शाप मानणारा,स्वातंत्र्यप्रिय,
रणझुंझार, लढवय्या, जनसामान्यांचे जन्मसिद्ध अधिकार हिरावणार्या धुंद,पाशवीप्रवृत्तीला व निर्मम दडपशाहीला वठणीवर आणण्यास प्रतिज्ञाबद्ध झालेले धाडस,एक सत्पुरूष,सेवक,सुधारक, विचारवंत,वीर योद्धा, लोकनेता,लोकसंग्राहक,
कुशल संघटक, सेनापती,कलावंत, कुटुंबवत्सल व्यक्ती,प्रखर देशभक्त, क्रांतीकारक आणि तत्त्वचिंतक अशा विविध गुणांनी बिरसा व्यक्तिमत्व मंडित झाले आहे. जल,जंगल व जमीन हक है हमारा, उलगुलान जारी रहेगा चा नारा बुलंद करणारे अशे अष्टपैलू भगवान बिरसा मूंडा यांची १४८वी जयंती आज रोजी तलासरी नाका क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौक तलासरी येथे तलासरी नगर पंचायत चे नगराध्यक्ष श्री.सुरेश दामा भोये साहेब, उपनगराध्यक्ष श्री.सुभाष जेठ्या दुमाडा साहेब, आदिवासी कृतज्ञ समाज बहूउद्देशीय संस्था तलासरी अध्यक्ष श्री.दत्तात्रय महादू कोम सर तसेच तालुक्यातील बहूसंख्य सन्माननीय समाज बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत तलासरी येथील क्रांतिसुर्य बिरसा मुंडा चौकात
अभिवादन व शत शत नमन करून संपन्न झाला
